उल्हासनगरातील विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:14 PM2021-07-01T20:14:31+5:302021-07-01T20:16:07+5:30

भारत गॅस एजन्सीच्या रिक्षाचालकाकडून घेतली लाच. गुन्हे अन्वेषण विभागाकडून रंगेहात करण्यात आली अटक.

Constable of Vithalwadi Transport Department in Ulhasnagar arrested while accepting bribe o f Rs 500 | उल्हासनगरातील विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक

उल्हासनगरातील विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक

Next
ठळक मुद्देभारत गॅस एजन्सीच्या रिक्षाचालकाकडून घेतली लाच.गुन्हे अन्वेषण विभागाकडून रंगेहात करण्यात आली अटक.

उल्हासनगर : भारत गॅस एजन्सीच्या रिक्षा चालकाकडून ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या विठ्ठलवाडी वाहतूक विभागाचे हवालदार गणेश चौधरी याला गुन्हे अन्वेषण विभागाने गुरूवारी दुपारी रंगेहात अटक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-४ विठ्ठलवाडी वाहतूक विभागाचे हवालदार गणेश दयाराम चौधरी यांनी भारत गॅस एजन्सीचे रिक्षा चालक यांना गॅस वाहतूक करण्यासाठी दरमहा ७०० रुपयांची मागणी केली. रिक्षा चालकांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केल्यावर, गुन्हे अन्वेषण विभागाने यशवंत विद्यालय परिसरात गुरुवारी दुपारी सापळा रचला. 

७०० ऐवजी तोडजोड अंती ५०० रुपये घेताना वाहतूक हवालदार चौधरी यांना रंगेहात अटक केली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सुषमा पाटील, पोलीस हवालदार परदेशी यांच्यासह पथकाने कारवाई केली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

Web Title: Constable of Vithalwadi Transport Department in Ulhasnagar arrested while accepting bribe o f Rs 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app