काँग्रेस 15 वर्षानंतर स्वबळावर लढणार

By Admin | Updated: September 28, 2014 03:09 IST2014-09-28T03:09:42+5:302014-09-28T03:09:42+5:30

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे.

Congress will fight on its own after 15 years | काँग्रेस 15 वर्षानंतर स्वबळावर लढणार

काँग्रेस 15 वर्षानंतर स्वबळावर लढणार

>कवाडे गट सोबत : समाजवादी पार्टीशी आघाडी नाही
नवी दिल्ली/मुंबई : काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे. 
शुक्रवारी रात्री उशिरार्पयत समाजवादी पार्टीसाठी 8 जागा सोडण्याच्या प्रस्तावासह राज्यात आघाडी करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. परंतु दिल्लीतील चर्चेनंतर तो बदलून स्वबळावर लढण्याचे ठरले. शुक्रवारी रात्री राहुल गांधी, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश आणि अन्य नेते 143 जागांचे उमेदवार ठरविण्यासाठी चर्चा करीत असताना मिस्त्री यांनी सपासोबत आघाडी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेस सपाशी लढत असल्याने महाराष्ट्रात जर आघाडी केली तर त्यातून चुकीचे संकेत जातील. असे संकेत पक्षाच्या हिताचे नाहीत, असे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना सांगितले. सपाने ज्या 8 जागांची मागणी केली होती, त्या जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. या आठही जागा विजय मिळवून देणा:या आहेत, असे काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे सपाशी आघाडी तोडण्याचे आणि त्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी मोहन प्रकाश यांना दिले आणि दुस:याच क्षणी ही आघाडी तुटली. आम्ही मागत होतो त्या जागा द्यायलाही काँग्रेस तयार नसल्याने  आघाडी करणो शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू, असे आझमी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
कवाडेंचे उमेदवार पंजावर
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला काँग्रेसने पाच जागा दिल्या असून तेथील उमेदवार काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढतील, असे पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. देवळाली, भुसावळ, अंबरनाथ, भंडारा आणि अजरुनी मोरगाव या त्या जागा आहेत. प्रचाराला वेळ कमी असल्याने आम्ही आमचे उमेदवार पंजावर उभे करीत आहोत, असे ते म्हणाले.
 
 
भाजपाने स्वाशेसं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंशी युती केली आहे. काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी आघाडी केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बहुजन समाज पार्टीने कोणाशीही आघाडी केलेली नाही.

Web Title: Congress will fight on its own after 15 years