शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरुद्ध कॉँग्रेस आंदोलन करणार

By admin | Updated: October 2, 2015 00:19 IST

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी ५ व ६ आॅक्टोबरला आंदोलन करणार आहे,

मुंबई : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी ५ व ६ आॅक्टोबरला आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.लोकोपयोगी निर्णयांमुळे झालेला खर्च व पेट्रोल-डिझेलच्या कमी झालेल्या किमतीमुळे झालेली महसुली घट भरून काढण्यासाठी करवाढ केल्याचा दावा सरकार करीत आहे; परंतु सरकारने कोणत्या लोकोपयोगी योजना आणल्या की ज्यामुळे आर्थिक बोजा वाढला, ते सरकारने जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सामाजिक न्यायाच्या योजनांना सातत्याने कात्री लागली आहे. कर्जमाफी देण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. मग सरकारने नेमका पैसा कुठे खर्च पैसा केला, असा सवालही खासदार चव्हाण यांनी केला.एलबीटी, टोलमाफीच्या घोषणांची पूर्तता सरकारने करावी; पण त्याचा बोजा जनतेवर टाकू नये. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्याहून कमी झाल्या; पण केंद्र सरकारने त्या प्रमाणात भारतातील ग्राहकांना लाभ मिळवून दिला नाही. उलटपक्षी चार वेळा उत्पादनशुल्क वाढवून पेट्रोलवर प्रतिलिटर ७.५० रुपयांचा अतिरिक्त भार ग्राहकांवर लादला. पेट्रोल-डिझेलमध्ये केंद्र सरकारने जनतेच्या खिशातील हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत वळते केले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पैसा आणायला हवा होता; परंतु राज्य सरकारचा प्रभावच नसल्याने हे सरकार केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक पॅकेज आणू शकलेले नाही, अशी टीकाही खासदार चव्हाण यांनी केली.सनातनविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांना कठोर शिक्षेची धमकी दिली जात आहे. तरीही सरकार सनातनवर कारवाई करण्यास तयार नाही. कारण, सनातनला राज्य सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)