शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने घेतला धडा, चला जनतेकडे वळा !

By admin | Updated: June 5, 2014 01:01 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शहर काँग्रेस आता नव्या लढाईसाठी कामाला लागली आहे. नगरसेवक, महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार व शहर काँग्रेसचे

लोकसभेतील पराभवाचा आढावा : ठाकरे घेताहेत विधानसभानिहाय बैठकानागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शहर काँग्रेस आता नव्या लढाईसाठी कामाला लागली आहे. नगरसेवक, महापालिका  निवडणुकीतील पराभूत उमेदवार व शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाचा आढावा  घेतला जात  आहे. विधानसभानिहाय बैठका घेण्यासही सुरुवात झाली असून भविष्यासाठी जबाबदार्‍या निश्‍चित केल्यात जात आहेत. लोकांमध्ये जास्तीत जास्त  संपर्क वाढवून त्यांची कामे करा, त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करा, त्यांना पक्षाशी जोडा, असा मूलमंत्र शहर काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व  कार्यकर्त्यांंना देत आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी येत्या काळात काँग्रेसला सक्षम करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. ८ तारखेला राणीकोठी येथे  सकाळी ११ वाजता  मंथन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहाही विधानसभेतील नेते, पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख  कार्यकर्त्यांंंना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी मंगळवारी महापालिकेत ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात  आली. या बैठकीनंतर आता विधानसभानिहाय नगरसेवक व महापालिका निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार यांच्या बैठका घेतल्या जात  असून त्यांच्याकडून ‘ग्राऊंड रिअँलिटी’ समजून घेतली जात आहे. बुधवारी दक्षिण नागपूरची बैठक पार पडली. गुरुवारी पश्‍चिम नागपूर व शुक्रवारी  दक्षिण- पश्‍चिम नागपूरची बैठक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा नगरसेवक किती मतांनी निवडून आला व लोकसभा निवडणुकीत त्या नगरसेवकाच्या प्रभागात किती मतांनी  काँग्रेस मागे राहिली, याचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेस मागे राहण्यासाठी नेमकी कारणे कोणती, ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे  लागेल आदी मुद्यांवर सविस्तर आढावा घेतला जात आहे. सोबतच महापालिकेत कशा पद्धतीने जनतेची कामे करून मताधिक्य भरून काढता येईल,  यावरही सूचना मागविल्या जात आहेत. बुधवारी दक्षिण नागपुरातील नगरसेवक व काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. तीत शहर अध्यक्ष विकास  ठाकरे यांच्यासह नगरसेवक प्रशांत धवड, तिवारी, संजय महाकाळकर, ढोके, दीपक कापसे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, निमिषा शिर्के, अमान  खान, तराळे  व दक्षिण नागपुरातील महापालिकेतील पराभूत उमेदवारही उपस्थित होते.  (प्रतिनिधी)नगरसेवक व संघटनेत समन्वय असावा -दक्षिणच्या बैठकीत  नगरसेवक व काँग्रेस पदाधिकार्‍यांकडे समन्वय असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.   प्रभाग अध्यक्ष व नगरसेवकांनी  मिळून काम करावे. प्रभागात पालकमंत्र्यांनी दंडाधिकार्‍यांची त्वरित नियुक्ती करावी. पक्ष संघटनेतील  बुथ कमिटी व वॉर्ड कमिट्या त्वरित नेमाव्या,  आदी सूचनाही या वेळी करण्यात आल्या. कुणाला भाजप तिकीट देणार आहे का ?-लोकसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांना सेट केल्याची चर्चा आहे. कोण कुणाच्या घरी कशासाठी गेले, याचीही  आपल्याकडे माहिती आहे. त्यामुळे कुणाला पुढील महापालिकेची निवडणूक काँग्रेसकडून लढायची नसेल, भाजपच्या तिकिटाचे कमिटमेंट झाले  असेल तर तसे मोकळेपणाने सांगा.  किमान त्या प्रभागात दुसरा उमेदवार शोधून त्याला कामाला लावता येईल, अशा कानपिचक्याही विकास ठाकरे  यांनी उपस्थितांना  दिल्या.