शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राकाँच्या घरभेदीपणापासून काँग्रेसची सुटका

By admin | Updated: October 12, 2014 01:20 IST

धर्मनिरपेक्ष शक्तीला सोबत घेऊन काँग्रेस संपूर्ण शक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून राष्ट्रवादीशी युती तुटल्याने त्यांच्या घरभेदीवृत्तीपासूनही काँग्रेसची सुटका झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत

रिता बहुगुणा : काँग्रेसचीच सत्ता येणारविकास मिश्र - नागपूर धर्मनिरपेक्ष शक्तीला सोबत घेऊन काँग्रेस संपूर्ण शक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून राष्ट्रवादीशी युती तुटल्याने त्यांच्या घरभेदीवृत्तीपासूनही काँग्रेसची सुटका झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती उत्तम आहे. काँग्रेसच अपेक्षापूर्ती करणारा पक्ष असल्याने जनतेचा कौल आम्हाला मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा- जोशी यांनी व्यक्त केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या नागपुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने विशेष संवाद साधला.त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील निवडणूक वेगळी आहे. येथे काँग्रेसकडे परंपरागत आणि विश्वसनीय मते आहेत. केंद्रातील मोदी सरकारने अपेक्षाभंग केल्याने त्यांच्यावर ग्रामीण भागातील जनता नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे. महाराष्ट्रात आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असे सध्याचे चित्र आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची आघाडी तुटल्याने काही परिणाम होईल का, या प्रश्नावर रिता बहुगुणा जोशी म्हणाल्या, महाराष्ट्रातील गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव माझ्याजवळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा व्यवहार आघाडी असतानाही व्यवस्थित नव्हता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेस पूर्ण ताकदीने मदत करायची. परंतु जिथे काँग्रेसचे उमेदवार उभे असायचे तिथे राष्ट्रवादीकडून घरभेदीपणा केला जायचा.