शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:24 IST

Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Shaktipeeth Mahamarg: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही याला तीव्रपणे विरोध दर्शवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शक्तिपीठ महामार्गांत मोठा भ्रष्टाचार असल्याचा दावा केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शक्तिपीठ साठी २० लाख कोटींचा कर्ज डोक्यावर घेत आहेत, हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी. वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री काही असेल, तरी हा प्रोजेक्ट रेटून केला जाईल. समृद्धी महामार्गाचे झाले, तेच इथे करायचे आहे. हा सर्व विषय कमिशनखोरी साठी आहे, समृद्धी महामार्ग होत असताना देखील झाला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, आता तसाच भ्रष्टाचार शक्तिपीठ महामार्गावरून करायचा आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मोर्चात सहभागी व्हायचे का नाही हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील

हिंदी भाषेच्या मोर्चात सहभागी व्हायचे का नाही, हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शैक्षणिक धोरणावर निधी कमी केला असल्याने शिकवायला साधनसामग्री नाही. शिक्षकही नाहीत. इतके दुर्दशा झालेली असताना आपण भाषा वाढवत आहोत. या निरर्थकवादापेक्षा मूलभूत शैक्षणिक गरजेवर खर्च व्हायला हवा. मराठी ही मातृभाषा आहे, तर हिंदी राज्यभाषा आहे, आणि इंग्रजी ज्ञान भाषा आहे. एक राष्ट्र, एक भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे हा गोंधळ सुरू आहे. काही काळानंतर हिंदी ही एकच भाषा देशात ठेवण्याचा घाट केंद्र सरकारचा आहे. भारत संशोधनामध्ये मागे पडलेला आहे, हे दिसत आहे. जर संशोधन आणि शिक्षणावर पैसे खर्च नाही केले तर, एक महाशक्ती होण्याचे जे आपले स्वप्न आहे, ते केवळ एक स्वप्न राहील. RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे, एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दरम्यान, आपल्या देशात विविधता आहे, आणि ती जपायला हवी. ठाकरे बंधू मोर्चामुळे एकत्र येत आहेत, असे नाही, गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू आहे. घरातला वाद आहे, ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे घटक आहेत, कोणाबरोबर युती करायची त्यांचा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गhindiहिंदीmarathiमराठीcongressकाँग्रेस