शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अध्यक्षांचे राजीनामे फेटाळले

By admin | Updated: May 24, 2014 01:00 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांनी पाठविलेले आपल्या पदाचे राजीनामे

मुंबईच्या बैठकीत कारणमीमांसा : सरकारने कार्यकर्त्यांना बळ द्यावे

नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांनी पाठविलेले आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी फेटाळले. मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागावे व त्वरित कार्यकारिणी तयार करावी, असे निर्देशही देण्यात आले. दादर येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी जिल्हानिहाय आढावा घेतला. बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. नागपूरच्या बैठकीत रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले, निवडणूक काळात सरकार व संघटनेत ताळमेळ नव्हता. आपण प्रसिद्धीत मागे पडलो. आरोपांना उत्तरे दिली नाही. येत्या निवडणुकीत याकडे लक्ष द्यावे. विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार जवळपास जाहीर झाले आहेत. ते लोकांमध्ये फिरत आहेत. वेळेवर उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवार मतदारांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार येत्या १५ दिवसात जाहीर करा, अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली. माजी खासदार मुकुल वासनिक यांनी विधानसभा जिंकायची असेल तर जनतेची कामे करावी लागतील, असा मुख्यमंत्र्यांसमक्ष सल्ला दिल्ला. सतीश चतुर्वेदी यांनी काँग्रेस संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी सरकारने बळ देण्याची मागणी केली. विकास ठाकरे म्हणाले, भाजपने दोन वर्षांपासून उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसने शेवटपर्यंत मुत्तेमवार यांची उमेदवारी जाहीर केली नाही. केंद्र व राज्य शासनाने ताकद दिली असती, तर चित्र वेगळे असते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना उमेदवाराचे जनतेतील काम बघा. बाहेरचे उमेदवार लादू नका, प्रयोग करू नका, नाहीतर सहाही जागा हातून जातील, असा धोकाही त्यांनी वर्तवित पक्षश्रेष्ठींना सतर्क केले. पालकमंत्र्यांनी उरलेल्या दिवसात शहरातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायला हवे. बूथ कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर नियुक्ती देऊन, विशेष कार्यकारी अधिकारीपद देऊन ताकद द्यावी लागेल. मंत्र्यांनी जनतेत जाऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीला नगरसेवक प्रशांत धवड, रेखा बाराहाते, आभा पांडे, शीला मोहोड, सरस्वती सलामे, रेखा नंदनवार, निमिषा शिर्के, दीपक वानखेडे, बाबुराव तिडके, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, प्रकाश वसू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)