शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: September 28, 2014 01:01 IST

निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी काँग्रेसने आपल्या शक्तीचे दर्शन घडविले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहरातील उमेदवार नितीन राऊत (उत्तर),

मिरवणूक : हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवार पोहोचले अर्ज भरायला नागपूर : निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी काँग्रेसने आपल्या शक्तीचे दर्शन घडविले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहरातील उमेदवार नितीन राऊत (उत्तर), विकास ठाकरे (पश्चिम), सतीश चतुर्वेदी (दक्षिण), अनिस अहमद (मध्य), प्रफुल्ल गुडधे पाटील (दक्षिण-पश्चिम) आणि अभिजित वंजारी (पूर्व) हे एका खुल्या जीपवर एकत्रच भव्य मिरवणुकीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काँग्रेससोबतच शिवसेना व इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांची सुद्धा आपापल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज सादर केले. परंतु सर्वाधिक लक्ष वेधले ते काँग्रेसच्या मिरवणुकीने. या मिरवणुकीला संविधान चौक येथून सुरुवात झाली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. त्यानंतर एका खुल्या जीपवर विलास मुत्तेमवारांसह सर्व उमेदवार स्वार झाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. काँग्रेसने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते. झेंडे, टोप्या आणि उमेदवारांचे मुखवटे घालून कार्यकर्ते आले होते. मिरवणुकीतील बँड पथकाने आपल्या सादरीकरणाद्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविलाच परंतु नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. पोलिसांना धक्काबुक्की काँग्रेसच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा लोंढाच जिल्हाधिकारी कार्यालयात शिरू लागला. तेव्हा गेटवरील पोलिसांना रोखणे कठीण गेले. काही पोलिसांना थोडीशी धक्काबुक्कीही झाली. बॅरिकेट्ससुद्धा कार्यकर्त्यांना रोखण्यास असमर्थ ठरले. शिवसेना, मनसेनेही दाखविली शक्ती शिवसेनेचे उमेदवार किरण पांडव (दक्षिण) आणि अजय दलाल (पूर्व) यांनी सुद्धा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवार मिरवणुकीद्वारे अर्ज सादर करण्यासाठी पोहोचले. लाल फेटा बांधून असलेले पांडव लक्ष वेधून घेत होते. मनसेचे रितेश मेश्राम (उत्तर नागपूर)चे उमेदवार यांनी सुद्धा मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांमध्ये नारेबाजीची स्पर्धा काँग्रेसचे उमेदवार हे प्रथम उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आले होते. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार अर्ज सादर करायला आले. दोन्ही पक्षाचे उमेदवार हे अर्ज सादर करण्यासाठी आत गेले. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते हे बाहेरच प्रतीक्षा करीत होते. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी हे अर्ज सादर करून बाहेर पडत असतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जय भवानीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वारे पंजाचा आवाज बुलंद केला. काही वेळ दोन्ही बाजूंनी नारेबाजी सारखी सुरूहोती.