शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:30 IST

corona vaccination: केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांच्या केंद्र सरकारवर टीकाभाजपला कोरोनाचे गांभीर्य नाही - पटोलेकेंद्राकडून पुरेसा लसीचा पुरवठा नाही - पटोले

मुंबई: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress) पक्षाने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करून राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याची मागणी केली होती. देशातील डॉक्टरांची सर्वांत मोठी संघटना इंडियन मेडिकल असोसिएशननेही पंतप्रधानांना पत्र लिहून हीच मागणी केली आहे. पण केंद्र सरकरने ही मागणी अमान्य केली आहे. १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (nana patole criticised pm narendra modi govt on corona vaccination) 

नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या आडमुठ्या आणि लस सार्वत्रिकरणास अडवणूकीच्या धोरणामुळे देशातील केवळ तीन राज्येच  लोकसंख्येच्या फक्त ५% लसीकरणापर्यंत पोहचली आहेत. हा अतिशय गंभीर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक प्रकार आहे. आत्तापर्यंत केवळ ८.३० कोटी लोकांनाच लस देण्यात आली आहे. सर्वांना लस न देता प्राधान्य गटांनाच लस देण्याची केंद्र सरकारची भूमिका शास्त्रीय नाही. ज्यांना पाहिजे असेल, ज्यांची इच्छा आहे त्याला लस दिली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 

तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका

भाजपला कोरोनाचे गांभीर्य नाही

कोरोनाची लस खाजगी हॉस्पिटलसह सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे. अमेरिकेसह इतर देशांनीही १८ वर्षांवरील सर्वांना लस देणे सुरू केले आहे. परंतु, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही.नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने तरुण मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण याच वयोगटात जास्त दिसून आले आहे. त्यांना लसीची गरज सर्वांत जास्त आहे, असे पटोले यांनी सांगितले.

नीती आयोगाची भूमिका पोषक नाही

कोविड स्प्रेडींग गट कमी करून समाजाची हर्ड इम्युनिटी तयार करायची असेल, तर कमीतकमी ६० % लसीकरण केले पाहिजे. इंडियन मेडिकल असोशिएशनेही १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु नीती आयोगाची भूमिका मात्र याला पोषक नाही. इस्राइलसह जगातील अनेक देशांनी १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचे सूत्र स्विकारलेले आहे. मात्र, भारत सरकारच त्यावर निर्णय घेणे टाळून तरुणाईला कोविडच्या गर्तेत ढकलण्याचे काम करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. 

“वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत 

केंद्राकडून पुरेसा लसीचा पुरवठा नाही

महाराष्ट्रात लसीकरण वेगात सुरु आहे पण राज्याला केंद्राकडून पुरेसा लसीचा पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्रासह काही राज्यात अवघे तीन ते चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारकडून १५ एप्रिल नंतर लसीचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे. लसीकरणासाठी असलेली वयाची अट शिथील करून राज्याला लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची आवश्कता आहे, अशी मागणी करत केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठाही मुबलक प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. यासोबतच रेमडेसीवीरची सहज उपलब्धता करून देणेही गरजेचे आहे, असे नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक भागात रुग्णांचे नातेवाईक या रेमडेसीवीरसाठी रांगा लावत आहेत. या इंजेक्शनची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणावी, रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखून ते सर्वत्र सहज उलपब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असे म्हणत केंद्राने लसींचा योग्य पुरवठा नाही केल्यास केंद्र सरकार व भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण