nitin raut appealed people regarding meter reading | “वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत 

“वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत 

ठळक मुद्देनितीन राऊत यांचे वीज ग्राहकांना आवाहनवीज बिल आणि थकबाकीबाबत बैठकवीज खरेदी कराराचे पुनरावलोकन - राऊत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे वीज ग्राहकांच्या तक्रारींची संख्याही वाढताना दिसत आहे. मंत्रालयात वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे. (nitin raut appealed people regarding meter reading)

कोरोना काळात रीडिंग न घेता बिले पाठवण्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले पाठवावीत. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अॅपद्वारे रीडिंग पाठवले, तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल. कोरोनाचा विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन नितीन राऊत यांनी यावेळी केले. 

 

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

स्थानिक कार्यालयात तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था 

थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून, त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देत ग्राहकांना ऑनलाइन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येणार नाही किंवा मोबाइल अॅपचा वापर करू शकत नाही, त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाइन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश नितीन राऊत यांनी यावेळी दिले. 

वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन

वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज सुमारे ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य

दरम्यान, महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. प्रचंड थकबाकी वाढवून महावितरणचे खासगीकरण करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र आम्ही ही थकबाकी वसूल करून खासगीकरणाचे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे नेते ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वी केली. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nitin raut appealed people regarding meter reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.