Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 11:44 AM2021-04-07T11:44:03+5:302021-04-07T11:49:54+5:30

fact check सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या लेटरहेडवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी बंद झालेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी सरकारकडून दिली जात आहे. जाणून घ्या यामागील सत्य...

केंद्रातील मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ पासून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत निश्चलनीकरणाचा (Demonetization) निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदींनी या निर्णयातून देशवासीयांना मोठा धक्का दिला होता.

पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचा मोठा परिणाम देशवासीयांवर झाल्याचे पाहायला मिळाले होते. विरोधकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. तर, यानंतरच्या कालावधी नोटा बदलायला गेलेल्या काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही पाहायला मिळाले होते.

नोटबंदीच्या काही दिवसांनी केवळ RBI मध्ये जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात होत्या. मात्र, काही महिन्यांच्या मुदतीनंतर ती योजना बंद करण्यात आली. नोटबंदीमुळे देशवासीयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. (fact check for rbi alert)

आजही नोटबंदीचे नाव जरी काढले, तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र, सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या लेटरहेडवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी बंद झालेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी सरकारकडून दिली जात आहे. (rbi alert demonetized notes of rupees 500 and 1000 exchange)

नोटाबंदीमध्ये बंद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सुविधा परदेशी पर्यटकांसारख्या खास लोकांसाठी आहे. देशातील मध्यवर्ती बँक RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लेटरहेडवर ही माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

असे म्हटले जात आहे की नोटाबंदीमध्ये बंद असलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ही सुविधा परदेशी पर्यटकांसाठी असल्याचे म्हटले जात आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीमध्ये जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या गेल्या.

केंद्र सरकारने यानंतर ५०० रुपयांची नवीन नोट चलनात आणली. मात्र, एक हजार रुपयांची नोट चलनातून पूर्णपणे बाद करण्यात आली. एक हजार रुपयांऐवजी २ हजार रुपयांची नोट केंद्र सरकारकडून चलनात आणली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा केली. यानंतर लोकांना बर्‍याच काळासाठी नोटा बदलण्याची संधी देण्यात आली. पण ही मुदत संपली आहे.

मात्र, सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या संकेतस्थळाला भेट दिल्यास नोटांच्या देवाणघेवाणीसाठी वेळ वाढवण्याबाबत कोणतीही अधिसूचना, मार्गदर्शक सूचना किंवा ऑर्डर सूचना आढळल्या नाहीत.

सोशल मीडियामध्ये ज्या प्रकारचे पत्र व्हायरल होत आहे, कोणतेही पत्र वेबसाईटवर उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सरकारी माहिती एजन्सी ही पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) ची एक तथ्य तपासणी टीम आहे, जी व्हायरल होत असलेल्या अफवा आणि बनावट माहितीची चौकशी करते आणि सरकार किंवा यंत्रणेकडून माहिती घेऊन त्याविषयी सत्य सांगते.

पीआयबीने ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र खोटे असून, अशी कोणतीही अधिसूचना RBI कडून काढण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रावर विश्वास ठेवू नये. तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मद्वारे दरमहा शुल्क आकारण्यासाठी राबविण्यात येणारी ‘ऑटो डेबिट’ प्रणालीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. अनेक बँकांकडून यासंदर्भात मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.

कोट्यवधी ग्राहकांना RBI च्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, ‘ऑटो डेबिट’ सुविधा नेहमीप्रमाणे सुरुच राहणार आहे. तसेच नव्या प्रणालीची अंमलबजाणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँका आणि वित्त संस्थांना कारवाईचा इशारा आरबीआयने दिला आहे.