तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:48 PM2021-04-07T15:48:49+5:302021-04-07T15:51:48+5:30

वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी केल्याने शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.

shiv sena vishwanath mahadeshwar criticised trupti sawant for joining bjp | तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका

तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचा अवमान केला; माजी महापौरांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देतृप्ती सावंत यांच्यावर शिवसेनेतून टीकामाजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला हल्लाबोलबंडखोर तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी केल्याने शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. मात्र, यावरून शिवसेनेत नाराजी असल्याचे दिसून येत असून, तृप्ती सावंत यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे, अशी टीका माजी महापौरांनी केली आहे. (vishwanath mahadeshwar criticised trupti sawant) 

बाळा सावंत हे निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेने अनेक संधी दिलेल्या आहेत. त्यांना नगरसेवक केले, आमदार केले. कोणत्या पद्धतीचा अन्याय केला नाही. तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे, अशी टीका माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. 

“वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत 

नारायण राणेंना केले पराभूत

तृप्ती सावंत कार्यरत नसताना त्यांना आमदारकी दिली. नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराला शिवसैनिकांच्या ताकदीमुळे पराभूत करण्यात यश मिळाले, असे सांगत शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. पण त्यांनी आता भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार घेतला. मात्र, तृप्ती सावंत यांच्या जाण्याने कोणत्याही पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नाही, असा दावा महाडेश्वरांनी केला. 

बंडखोरीचा शिवसेनेला जोरदार फटका

२०१९ मध्ये तृप्ती सावंत यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्याने तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. या बंडखोरीचा फटका तृप्ती सावंत आणि विश्वनाथ महाडेश्वर यांना बसला. हे दोघेही निवडणुकीत पराभूत झाले.

दरम्यान, भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 

Web Title: shiv sena vishwanath mahadeshwar criticised trupti sawant for joining bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.