काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 23:00 IST2019-04-12T22:44:14+5:302019-04-12T23:00:10+5:30

अपघातात निंबाळकर गंभीर जखमी

congress mla Anjali Nimbalkars car met with an accident near Solapur | काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीला अपघात

काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीला अपघात

सोलापूर: काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्या गाडीला सोलापूरजवळ अपघात झाला. निंबाळकर यांच्या गाडीनं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्यांची गाडी दोनदा उलटली आणि खंदकात जाऊन पडली. निंबाळकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अंजली निंबाळकर या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाची आहेत. त्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत.



कर्नाटकमधील खानापूरच्या आमदार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या गाडीला सोलापूर-विजयपूर महामार्गावरील हत्तूर गावाजवळ अपघात झाला. त्यांची गाडी दोनदा उलटल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात निंबाळकर यांच्या गाडीच्या चालकालादेखील इजा झाली. त्याच्या छातीला दुखापत झाली आहे. या अपघातात काही गाड्यांचं नुकसानदेखील झालं. 

Web Title: congress mla Anjali Nimbalkars car met with an accident near Solapur