शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:34 IST

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल.

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाशी काँग्रेसचे दिल्लीतील नेते तयार नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असे दिल्लीतील नेत्यांचे मत असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसने समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्टÑवादी-शिवसेनेचे सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल, असे या नेत्यांना वाटते. त्यामुळे जेवढे ताणता येईल तेवढे ताणून धरायचे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आमच्या पक्षात बंडखोरी होणार नाही. एखादा आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेला तर त्याच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला जाईल आणि त्याला पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार दिल्लीतून येणार आहेत. त्यांची आणि सोनिया गांधी यांची भेट झाली आहे. त्या भेटीची माहिती ते आम्हाला देतील, त्यानंतर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिलेला नाही, त्यांचा काही निरोप आला तर तो बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर चर्चा करू, असेही पाटील म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा द्या; युवा नेत्यांचे मतभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना अथवा राष्टÑवादीकडून सरकार बनविण्यासाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असे काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे मत आहे. विश्वजीत कदम, अमित देशमुख यांची देखील हीच भूमिका आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना