काँग्रेसने स्वत:सह ‘राष्ट्रवादी’ला बुडविले!

By Admin | Updated: September 13, 2016 05:03 IST2016-09-13T05:03:30+5:302016-09-13T05:03:30+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केला नसताना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर घोटाळ्याचे आरोप करत आमच्या नेत्यांच्या मागे तपासाचे शुक्लकाष्ठ लावले.

Congress drowned itself with 'Nationalist'! | काँग्रेसने स्वत:सह ‘राष्ट्रवादी’ला बुडविले!

काँग्रेसने स्वत:सह ‘राष्ट्रवादी’ला बुडविले!

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केला नसताना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर घोटाळ्याचे आरोप करत आमच्या नेत्यांच्या मागे तपासाचे शुक्लकाष्ठ लावले. निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वत: तर बुडाला पण आम्हालाही सोबत घेऊन बुडाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
अकोला येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना खा. पटेल म्हणाले, काँग्रेस पक्ष आपणच अल्पसंख्याकांचे कैवारी असल्याच्या आविर्भावात आहे. दलित आणि अल्पसंख्याकांना काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही, असा या पक्षाचा गैरसमज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच पाय ओढले आहेत.
राष्ट्रवादीला विदर्भात भरपूर वाव असून पक्षाध्यक्ष शरद पवार हे सतत विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. कर्जमाफीपासून ते कमी व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून पवारांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. पवारांसारखे दूरदृष्टी असणारे नेतृत्व ही पक्षाची खरी ताकद असून कार्यकर्त्यांनी यामधून ऊर्जा घेऊन काम केल्यास त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Congress drowned itself with 'Nationalist'!