शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने लोकायुक्त नियुक्त करण्याची काँग्रेसची मागणी

By admin | Updated: June 3, 2015 05:04 IST

गेली चार दशके महाराष्ट्रात नियमितपणे लोकायुक्तांच्या नेमणुका होत आल्या आणि लोकायुक्तांनी नियमाप्रमाणे कारभार केला.

मुंबई : गेली चार दशके महाराष्ट्रात नियमितपणे लोकायुक्तांच्या नेमणुका होत आल्या आणि लोकायुक्तांनी नियमाप्रमाणे कारभार केला. लोकायुक्तांचे पद राज्यात कधीच रिक्त राहिले नाही. तर शेजारच्या गुजरातमध्ये सलग १२ वर्षे हे पद रिक्त ठेवण्याची परंपरा नरेंद्र मोदींच्या काळात निर्माण झाली. दुर्दैवाने राज्यातील फडणवीस सरकार याच मार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात आहे. गेले सात महिने लोकायुक्तांचे पद रिक्त असून, ते तातडीने भरण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सलग १२ वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्तच नेमण्यात आले नव्हते. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर नाइलाजाने हे पद भरण्यात आले. महाराष्ट्रात मात्र नियमितपणे लोकायुक्तांच्या नेमणुका झाल्या. तांत्रिक कारणांमुळे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच राज्यात लोकायुक्त नव्हते. फडणवीस सरकार सत्तेवर येऊन सात महिने झाल्यानंतरही लोकायुक्तांची नेमणूक झाली नाही. तसेच उप लोकायुक्तांचेही पद रिक्त आहे. राज्यात ताबडतोब लोकायुक्त नेमण्याची मागणी निरुपम यांनी केली. या वेळी समाजवादी पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.