शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव

By admin | Updated: June 9, 2014 01:24 IST

नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही. सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही.

कार्यकर्त्यांंंचा आरोप : समीक्षा बैठकीत व्यक्त केला रोष नागपूर : नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही.  सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे मत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या  समीक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आले. ही बैठक रविवारी राणीकोठी येथे पार पडली.बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस  अहमद, माजी खासदार गेव्हबाबू आवारी, आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार एस. क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी  शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नेते विनोद गुडधे-पाटील आदी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांंंना सर्वप्रथम  बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपापल्या पद्धतीने पराभवाची समीक्षा करून विविध महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. कार्यकर्त्यांंंनी उपस्थित  केलेल्या भावना नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणार्‍या होत्या. नेत्यांनी शेवटी मनोगत व्यक्त केले.मुत्तेमवार यांनी व्यथित मनाने भावनांना वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची यापूर्वीही पिछेहाट झाली होती. परंतु, विदर्भातील  नागरिकांनी काँग्रेसचा हात सोडला नव्हता. यावेळी कुणी विरोधात काम केले किंवा कुणी कामच केले नसल्याने हरलो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार  ताकदवान होता. आरएसएस सारखी मोठी संघटना त्याच्या पाठीशी होती. आरएसएस कार्यकर्ते घरोघरी जाऊन परिवर्तन आणण्याचा प्रचार करीत  होते. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट १५ दिवसांपूर्वी जाहीर केले. यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.  प्रामाणिकपणे कार्य करणे हाच माझा दोष असून नागरिकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या उमेदवाराला निवडून दिले आहे, असे मुत्तेमवार यांनी  सांगितले.काँग्रेसने नागपूरचा विकास केला, पण नागरिकांनी या शहराला भकास करणार्‍यांना सत्तेवर बसविले. आपण पूर्ण क्षमतेने बाजू मांडू शकलो नाही.   ‘अपने दिलभी नही मिले और हातभी’, असे सूचक वक्तव्य नितीन राऊत यांनी केले.चतुर्वेदी यांनी घरभेद्यांना ओळखण्याचे व विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले, तर अहमद यांनी भूतकाळातील चुका  सुधारून पुढे जाण्यास सांगितले.(प्रतिनिधी)