शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी

By admin | Updated: September 14, 2016 06:31 IST

विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

पणजी : विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षाचे दोन आमदार विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेससोबत राहणार नसल्याची कल्पना आल्यामुळे पक्षाचे निरीक्षक तथा केंद्रीय सचिव डॉ. चेल्लाकुमार हे मंगळवारी तातडीने गोव्यात दाखल झाले. काँग्रेसचे बहुतेक आमदार सध्या नाराज व अस्वस्थही आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काँग्रेसच्या काही आमदारांना आॅफर्स देऊ लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या दोघा आमदारांनी पक्षास सोडचिठ्ठी देण्याचे ठरविल्यासारखी स्थिती आहे. विरोधकांनी एकत्र यावे, ही कल्पना प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो तसेच दिग्विजय सिंह हे अजून स्वीकारण्यास तयार नाहीत. तसेच काँग्रेस पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना पुढे आणत आहे, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे. निवडणूक तोंडावर आली, तरी व्यूहरचना ठरवली जात नसल्याने अनेक आमदार अस्वस्थ आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी तर अलीकडेच दिल्लीत राहुल गांधी यांच्या भेटीवेळी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर ठेवली. मडकईकर यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी दहा मिनिटेदेखील प्रदेशाध्यक्ष व अन्य पदाधिकारी थांबले नाहीत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मडकईकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चेल्लाकुमार करतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.