शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिट्ट्या वाजवून काँग्रेसचा गोंधळ

By admin | Updated: March 14, 2015 05:46 IST

शिट्टी वाजवून सलग चौथ्या दिवशी पालिका महासभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर शिवसेनेचे नगरसेवक आज चक्क धावून गेले़ त्या

मुंबई : शिट्टी वाजवून सलग चौथ्या दिवशी पालिका महासभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर शिवसेनेचे नगरसेवक आज चक्क धावून गेले़ त्यामुळे उभय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू झाली़ या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होण्यापूर्वी राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादीच्या गटनेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ मात्र दहा मिनिटांच्या सभा तहकुबीनंतर सभागृहाच्या दुसऱ्या सत्रातही गोंधळ सुरुच राहिल्यामुळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेसच्या आणखी सहा नगरसेवकांना निलंबित करीत सभा गुंडाळली़सोमवारी निलंबित केलेल्या सदस्यांचे निलंबन रद्द करण्यास महापौर तयार नसल्याने काँग्रेसने आज चौथ्या दिवशीही घोषणाबाजी सुरु केली़ ‘दादागिरी नही चलेगी’, ‘महापौर हाय हाय’, अशा घोषणांबरोबच यावेळीस शिट्ट्या वाजवून पालिकेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न काँग्रेस सुरू ठेवला़ त्यामुळे काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना महापौरांनी आज निलंबित केले़ मात्र सभागृहाबाहेर न जाता काँग्रेस सदस्यांचा गोंधळ वाढल्यामुळे शिवसेनेचे राजू पेडणेकर, मिराज शेख, अनिल सिंह हे नगरसेवक काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्यावर धावून गेले़ त्यामुळे या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली़ याचे रुपांतर हाणामारीत होईल, असे वाटत असतानाच समाजवादीचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि राष्ट्रवादीचे हरुन खान यांनी हस्तक्षेप करीत त्यांना एकमेकांपासून वेगळे केले़ त्यामुळे हाणामारी टळली़ मात्र गोंधळ सुरुच राहिल्याने महापौरांनी सभा तहकूब केली़ (प्रतिनिधी)