शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या समितीला विरोध हा देशाच्या सार्वभौमत्वावर घाला

By admin | Updated: December 24, 2014 23:39 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते

नागपूर : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात त्रुटी राहिल्या. मात्र मुंबईच्या विकासात पंतप्रधानांनी लक्ष घालूच नये, असे जर कोणाला वाटत असेल तो देशाच्या सार्वभौमत्वारच घाला ठरेल, अशी घणाघाती टीका बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.मुंबईच्या प्रश्नावरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारला केंद्राच्या विविध प्राधिकरणांची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक वर्षे जातात हा आजवरचा अनुभव आहे. हा कालापव्यय टाळण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली तर हा त्रास दूर होईल. म्हणून समिती असावी अशी विनंती केली होती. या समितीमुळे मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकारावर अतिक्रमण होणार नाही, मात्र पंतप्रधानांनी मुंबईच्या विकासात लक्षच घालू नये असे जर कोणाला वाटत असेल तर तो देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला ठरेल.यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची पुरेशी माहिती न घेता त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चुकीची माहिती दिल्या गेली. त्यामुळेच त्यांच्या पत्रात त्रुटी राहून गेल्या. पवार हे कधीही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. झोपी गेलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही.मुंबईचा विकास शांघाय किंवा सिंगापूर या शहराप्रमाणे नव्हे तर मुंबईची ओळख कायम ठेवूनच हे शहर जागाचा मानबिंदू ठरेल अशा पद्धतीने विकसित करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)