पुण्यात संगणक अभियंत्याचा खून

By Admin | Updated: May 31, 2014 05:22 IST2014-05-31T05:22:19+5:302014-05-31T05:22:19+5:30

हिंजवडीच्या इन्फोसिस कंपनीतील वरुण सुभाष सेठी (३४) या संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली़

Computer Engineer's blood in Pune | पुण्यात संगणक अभियंत्याचा खून

पुण्यात संगणक अभियंत्याचा खून

वाकड (जि़ पुणे) : हिंजवडीच्या इन्फोसिस कंपनीतील वरुण सुभाष सेठी (३४) या संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली़ मारुंजी-हिंजवडी रस्त्यावरील झाडाखाली गुरुवारी रात्री त्याचा मृतदेह आढळून आला. वरुणच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये इन्फोसिस कंपनीचे ओळखपत्र, काही बँकांची एटीएम कार्ड, टॅब हे साहित्य मिळाले. प्राथमिक अंदाजानुसार वरुणला कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याच्यावर वार करण्यात आले आणि आसपास कोणी नसल्याचे पाहून निर्जन ठिकाणी मृतदेह टाकून देण्यात आला असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Computer Engineer's blood in Pune