शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन

By admin | Updated: June 2, 2015 02:16 IST

चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ

मुंबई : चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन केले. केंद्र सरकारवर टीका केली म्हणून दलित विद्यार्थ्यांच्या गटावर बंदी घालणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे असून, या विद्यार्थ्यांवरील बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानंतर चेन्नई आयआयटीच्या प्राचार्यांनी या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातून या विरोधात आवाज उठवला जात आहे. केवळ केंद्र सरकारवर व त्यांच्या धोरणांवर टीका केल्याने बंदी घालणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. देशाच्या संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे़ बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. आंबेडकर-पेरियार गटावरील बंदी राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला. विद्यापीठे, आयआयटी अशी ठिकाणे विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे एक व्यासपीठ असते, त्यामुळे अशा प्रकारची बंदीची कारवाई रोखण्याची आवश्यकता आहे. दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेवर अशाप्रकारे बंदी घालणे हे घटनाविरोधी आहे़ सरकारने असे प्रकार त्वरित रोखावेत व यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदर विद्यार्थी गटावरील बंदीविरोधात रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा खोब्रागडे यांनी या वेळी दिला.