शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सहसरकार्यवाहपदी व्ही. भगय्या यांची वर्णी

By admin | Updated: March 16, 2015 02:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१५-१६ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. सलग तिस-यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१५-१६ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. सहसरकार्यवाहपदी सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे हे कायम असून, या पदावर व्ही. भगय्या यांचीदेखील वर्णी लागली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मूळचे हैदराबाद येथील भगय्या यांच्याकडे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे आता सहसरकार्यवाहपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भगय्या यांच्याऐवजी स्वत रंजनजी यांची बौद्धिकप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख म्हणून महावीर यांच्या जागेवर मुकुंदा सी.आर. यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय शारीरिक प्रमुख अनिल ओक यांच्याकडे सहव्यवस्थाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या जागेवर मराठवाड्यातील सुनील कुळकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. संपर्क प्रमुख हस्तिमल यांच्याऐवजी हे पद अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)