शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

मोठी बातमी... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५,३८० कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 6:21 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी अजूनही रस्सीखेच सुरू असली, तरी बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. 

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आकस्मिक निधीतून 5, 380 कोटींची मदत जाहीर केली आहे.  दरम्यान, याआधी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली होती. 

राज्यपालांनी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत जाहीर केली होती. तर दोन हेक्टरपर्यंतच्या फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. याबाबत राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले होते. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी जाहीर केला होता.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री