शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीची घाण स्वच्छ करा

By admin | Updated: October 10, 2014 22:57 IST

देवेंद्र फडणवीस : चिखलीत भाजपची प्रचारसभा

गुहागर : भारत स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक भारतीय सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व राज्ये स्वच्छ झाली पाहिजेत. महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची घाण स्वच्छ करावी लागेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. -भाजपचे उमेदवार डॉ. विनय नातू यांच्या प्रचारार्थ चिखली येथील सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मोदींनी चीन, अमेरिका, जपान दौरे केले. याआधी अमेरिकेच्या आदेशावर पंतप्रधान मान डोलवायचे. मोदी अमेरिकेमध्ये याचक म्हणून नाही तर शासक म्हणून गेले. अमेरिकेत जाऊन ते केवळ भारताचे नाहीत जगाचे नेते आहेत, असा उल्लेख तेथील प्रसार माध्यमातून झाला.काँग्रेस जाहिरातीतून महाराष्ट्र पहिला असल्याचे सांगत आहे, पण मागून की पुढून हे विचारण्याची गरज आहे. कारण सर्वाधिक ७ हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. सर्वाधिक महिलांवर बलात्कार, अत्याचार महाराष्ट्रात होतात. ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. ७० हजार कोटी खर्चून एक टक्का ही सिंचन क्षमता वाढली नाही. एवढे पैसे खर्चूनही कोणताच विकास झाला नाही मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी केला.महाराष्ट्रातील ५० टक्के तरुण २५ वर्षाच्या आतील आहेत. शिक्षण व्यवस्था कमकुवत आहे. देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असताना या तरुणांना दर्जात्मक शिक्षणाारोार कौश"य देणे ही आवश्यक आहे. अन्यथा समोर रोजगार असूनही त्यासाठी आवश्यक पात्रता तरुणांमध्ये नसेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी सांगितले. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळचे किती कार्यकर्ते आजच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, असा सवाल विनय नातूंनी विचारला. आघाडी सरकारच्या १०२ घोटाळ्यानंतर येथील घरेलू कामगार योजनेचा १०३ वा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)