दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 06:17 AM2024-05-26T06:17:51+5:302024-05-26T06:18:18+5:30

राज्यातील ९ विभागीय मंडळांतून यंदा १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Class 10th result 'online' tomorrow at 1 pm Application form from 28th May for verification | दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी  दिली. राज्यातील ९ विभागीय मंडळांतून यंदा १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

प्रथमच मेमध्ये दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती.  अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे. 

गुणपडताळणीसाठी २८ मे पासून करा अर्ज

  • गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. 
  • उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५ मध्ये गुण सुधारअंतर्गत परीक्षा देता येईल.

Web Title: Class 10th result 'online' tomorrow at 1 pm Application form from 28th May for verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.