शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 10:12 PM

२०२० मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर २०२०’ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीप वर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे.

ठळक मुद्देअमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासातर्फे निवड : २५ विद्यार्थ्यांची नावे मार्स रोव्हर २०२० द्वारे करणार प्रक्षेपितविद्यार्थ्यांच्या या अंतराळ भरारीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतूक

तळेगाव ढमढेरे :  पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी त्यांची नावे थेट मंगळावर कोरणार आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासातर्फे या शाळेच्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रवासाचे बोर्डिंग पासही मिळाले आहे. २०२० मध्ये नासातर्फे मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ‘मार्स रोव्हर २०२०’ पाठविले जाणार असून या यानाच्या एका चीप वर या सर्व विद्यार्थ्यांची नावे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या या अंतराळ भरारीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतूक होत आहे. नासाचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपवणार आहे. त्यासाठी स्टेनसिल्ड चीपवर आपली नावे पाठवून आपल्या खुना सोडण्याची संधी नासाने जगभरातील नागरिकांना दिली आहे.  नासाच्या संकेत स्थळावर ही नावे नोंदविता येणार आहेत. लांडेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा शेख यांनी त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे नासाच्या संकेतस्थळावर नोंदवीली होती. या साठी विद्यार्थ्यांचे इमेल आयडीही त्यांनी बनवीले. सर्व विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी नोंदनीझाल्याने मेल नासाने त्यांच्या मेल वर पाठवीले असून या प्रकल्पासाठी त्यांची नावे या यानाच्या चीपवर नोंदवीले जाणार असून ती या यानाद्वारे मंगळावर पाठवीली जाणार अहेत. अमेरिकेतील अवकाश संशोधन करणारी ‘नासा’ ही संस्था आहे. या संस्थेच्या बाबतीत मुलांना माहिती व्हावी, अवकाश व विविध ग्रहबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे. यादृृष्टीने हा उपक्रम राबवील्याचे मुख्याध्यापिका शेख यांनी सांगितले.  या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी  राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख नानासाहेब वाजे, सहशिक्षिका विजया लोंढ यांचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. चौकट नासा मार्फत २०२० मध्ये ‘मार्स रोव्हवर २०२०’ हे यान मंगळाचा अभ्यास करणयसाठी प्रक्षेपित केले जाणार आहे. त्यातील  एका चिपवर विद्यार्थ्यांची  नावे स्टेन्सिल  करून ती मंगळ ग्रहावर पाठवीली जाणार आहेत. यासाठी प्रत्येकाला फ्लाईंग  मिलियन्स पॉइंट मिळणार आहेत.    कोट नासाच्या मार्स रोव्हर २०२० या मोहिमेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे आमचे भाग्य आहे. लांडे वस्ती सारख्या ग्रामीण भागातील मुलांची नावे अवकाश यांना द्वारे मंगळावर पोहोचणार यावर विश्वासच बसत नाही, असे विद्यार्थ्यांचे पालक आमच्याशी संवाद करताना सांगत आहेत.          -रेशमा शेख मुख्याध्यापिका  लांडेवस्ती शाळाचौकट :काय आहे नासाची मोहिममंगळाचा अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षी नासातर्फे मंगळावर मार्स रोव्हर २०२० ही मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळावर यान पाठवीले जाणा असून या यानाच्या एका चिपवर जगभरातील १० लाख नागरिकांची नावे कोरली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती नासाचे संकेतस्थळ एमएआरएस.नासा.गीओव्ही यावर दिली आहे. या मोहिमेत एका चिपवर   स्टेनसिल्ड पद्धतीने ही कोरली जाणार आहे. नासाच्या कॅलीफोर्निया येथील पसाडेना जेट प्रोपोशन्सल लॅबोरिटीतल्या मायक्रोडिव्हायसेस लॅबोरिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सीलीकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या म्हणजेच ७५ नॅनॉमिटर रूंदित  ही १० लाख नावे नोंदविली जाणार आहेत. अशाच एका छोट्या डेमी आकाराच्या चीपवर ही नावे नोंदवीण्या येणार आहे. मार्स रोव्हर २०२० या यानाद्वारे ती मंगळावर पाठवीली जाणार आहेत. नागरिकांना ३० सप्टेंबर अखेर पर्यंत या मोहिमेसाठी ही नावे पाठविता येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाNASAनासा