शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 2:44 PM

अमित शहा यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे.

Amit Shah Fake Video Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या 'फेक' व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांचा पीए सतीश वनसोला याच्यासह 2 जणांना अटक केली आहे. आरबी बारिया असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो आम आदमी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेवंत रेड्डींना नोटीस, असाममधून काँग्रेस कार्यकर्त्याला अटकयाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही समन्स बजावले आहे. त्यांना 1 मे रोजी मोबाईल फोनसह दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिट (सायबर युनिट) समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आसाम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून दोन मोबाईल फोनसह एक लॅपटॉप जप्त केला आहे. रितम सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, तो काँग्रेसचा वॉर रुम समन्वयक आहे.

अमित शाहंचा काँग्रेसवर हल्लाबोलदरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित शाहंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पराभवाच्या भीतीने काँग्रेस खोटे व्हिडिओ दाखवून देशवासीयांची दिशाभूल करत आहे. देशातील आरक्षणावर एससी, एसटी आणि ओबीसींचा अधिकार आहे आणि जोपर्यंत भाजपची सत्ता आहे, तोपर्यंत त्याला कोणी हात लावू शकत नाही. INDI आघाडीला धर्माच्या नावावर आरक्षण द्यायचे आहे, त्यामुळेच त्यांनी कर्नाटकात ओबीसीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना दिले, अशी टीका त्यांनी केली. 

अमित शाहंच्या व्हिडिओमध्ये काय होतं?अमित शाह यांच्या प्रचार सभेतील क्लिपशी छेडछाड करुन एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अमित शहा देशातील आरक्षण संपवणार असल्याचे वक्तव्य टाकण्यात आले आहे. या संदर्भात रविवारी दिल्ली पोलिसांना दोन तक्रारी मिळाल्या होत्या, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या कलम 153, 153ए, 465, 469, 171जी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपा