शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की घोटाळ्याची हायकोर्टाकडून दखल

By admin | Updated: July 17, 2015 01:38 IST

चिक्की घोटाळ्याची चौकशी केली जावी, यासाठी केल्या गेलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्यावर तातडीने उत्तर

मुंबई : चिक्की घोटाळ्याची चौकशी केली जावी, यासाठी केल्या गेलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्यावर तातडीने उत्तर दाखल करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. टिटवाळा येथील संदीप बापूराव अहिरे यांच्या या जनहित याचिकेवर न्या. व्ही.एम. कानडे व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी न्यायालयाने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह कंत्राटे मिळालेल्या सर्व कंपन्यांना नोटिसा बजावल्या.या चिक्कीची अन्न व औषध प्रशासनाखेरीज (एफडीए) स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्याचा मुद्दा निघाला. त्यावर अभिनंदन वग्यानी यांनी सांगितले की, ‘याचिकाकर्ता म्हणतो म्हणून याची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही गरज भासल्यास चिक्कीची चाचणी करू शकतो. त्यामुळे चिक्कीची चाचणी करणार की नाही, हे आम्ही येत्या सोमवारी स्पष्ट करू.’ याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी येत्या सोमवारपर्यंत तहकूब केली.लहान मुलांसाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे प्रतिवादी मंत्री मुंडे यांच्यासह संबंधित कंत्राटदारांनी याचा खुलासा करायला हवा. या प्रतिवादींनी येत्या दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)चिक्कीबाबतची तक्रार : महिला बालकल्याण आयुक्त कार्यालयाकडून नगर जिल्ह्यात अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी ७ लाख ७७ हजार राजगिरा चिक्की पाकिटांचा पुरवठा केला होता. ही चिक्की माती, रेती आणि वाळूमिश्रित असल्याची तक्रार झाली होती. एफडीएने चिक्कीचे तीन नमुने २९ जून रोजी तपासणीसाठी घेतले होते. त्यांचा एकत्रित अहवाल गुरुवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्यअहमदनगर : अंगणवाडीतील बालकांना पुरवठा केलेली राजगिरा चिक्की अयोग्य असल्याचा अहवाल एफडीएने जिल्हा परिषदेला गुरुवारी सादर केला आहे. यापूर्वी शासकीय प्रयोगशाळा व केंद्र पुरस्कृत खासगी प्रयोगशाळेने चिक्कीला क्लीन चिट दिली होती. अद्याप दोन नमुन्यांचा अहवाल बाकी आहे.