शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांसाठी न्यायाधीश मुख्यमंत्र्यांकडे

By admin | Updated: July 4, 2014 06:21 IST

रोज एखादे तरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे येत असते. काही ना काही सोयी सुविधा मागत असते. मात्र मंगळवारी आलेले शिष्टमंडळ विशेष होते.

मुंबई : रोज एखादे तरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे येत असते. काही ना काही सोयी सुविधा मागत असते. मात्र मंगळवारी आलेले शिष्टमंडळ विशेष होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांनीच त्याचे नेतृत्व केले. विविध न्यायालयांचे न्यायाधीश त्या शिष्टमंडळात होते.
सध्या विविध न्यायालयांत असलेली जागा, कोर्टरूम कमी पडत आहे. न्यायालयाच्या जलद कामकाजासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई उच्च न्यायालयासाठी नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जागा मिळावी. शहर दिवाणी न्यायालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी जवळच्या एनसीसी बिल्डिंगमध्ये जागा मिळावी. तसेच न्यायाधीशांना अतिरिक्त कर्मचारी वर्ग मिळावा अशा मागण्या या शिष्ठमंडळाने केल्या. न्यायालयीन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा व्हावा असे अपेक्षित असेल तर या गोष्टी तातडीने करा आणि न्यायालयांना अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणीही या वेळी शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली. न्यायालयात तसेच न्यायालय परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासंदर्भात शासनाकडे सादर केलेल्या विविध प्रस्तावांच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. बैठकीस राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॅरीअस खंबाटा, मुख्य सचिव ज.स. सहारिया आदींचीही उपस्थिती होती.
या शिष्ठमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालय, मोटार अपघात न्यायालय या न्यायालयांच्या विस्तारीकरणाच्या मागण्यांबाबत तसेच अधिक पदांच्या निर्मितीसाठी सर्व बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)