मुख्यमंत्री कर्तबगार, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

By Admin | Updated: June 25, 2014 14:57 IST2014-06-25T14:52:35+5:302014-06-25T14:57:00+5:30

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचा उरक मोठा असून ते सर्वात कर्तबगार मुख्यमंत्री आहेत अशी पावती देत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

The chief minister, Udayan Raza's NCP is in the house | मुख्यमंत्री कर्तबगार, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

मुख्यमंत्री कर्तबगार, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

ऑनलाइन टीम

सातारा, दि. २५ - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचा उरक मोठा असून ते सर्वात कर्तबगार मुख्यमंत्री आहेत अशी पावती देत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी पक्षाच्या मुख्यमंत्रीविरोधी भूमिकेचा समाचार घेत राष्ट्रवादीलाच घरचा आहेर दिला. शरद पवार व अजित पवारांपेक्षा त्यांच्या कामाचा उरक मोठा असून, त्यांना बदलण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जावी,  अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
साता-यात एका पत्रकाद्वारे त्यांनी टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे पसरवले जाणारे बदलाचे चित्र हितावह नाही, असेही त्यांनी म्हटले. सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खटाटोप केला असून ते सर्वाधिक कर्तबगार मुख्यमंत्री असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यांनी समाजातील अनेक महत्वाचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत, अशा शब्दांत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पावती दिली. त्यामुळे त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्यामागे उभे राहत आगामी निवडणुका लढविण्याचे आवाहन उदयनराजे यांनी या वेळी केले.
 
 

Web Title: The chief minister, Udayan Raza's NCP is in the house