शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केसवानींचा आरोप छटवाल यांनी फेटाळला

By admin | Updated: July 29, 2015 02:58 IST

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या वकिलाने केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) मुख्य तपास अधिकारी ओ.पी. छटवाल यांच्यावर केलेला आरोप स्वत: छटवाल यांनी फेटाळला आहे.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या वकिलाने केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) मुख्य तपास अधिकारी ओ.पी. छटवाल यांच्यावर केलेला आरोप स्वत: छटवाल यांनी फेटाळला आहे. मेमन याच्यासाठी तुम्ही जामिनाचा अर्ज करा व त्या अर्जाला न्यायालयात सीबीआय विरोध करणार नाही, असे आश्वासन छटवाल यांनी मला दिले होते, असा आरोप याकूब याचे मुंबईतील वकील श्याम केसवानी यांनी केला होता. १९९३मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेची आणि याकूबचीही चौकशी छटवाल यांनी केलेली आहे.छटवाल सध्या गुडगाव येथील खासगी कंपनीचे विधी सल्लागार आहेत. केसवानी यांनी केलेला आरोप निराधार आहे, असे छटवाल यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. श्याम केसवानी यांनी म्हटले होते की, ‘‘खटला सुरू व्हायच्या आधी मी छटवाल यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, याकूबच्या जामिनासाठी तुम्ही अर्ज केला पाहिजे. या अर्जाला सीबीआय विरोध करणार नाही.’’ केसवानी म्हणाले की, खटल्याचा तो पहिल्याच दिवस असणार होता त्यामुळे मला ते ऐकून धक्काच बसला. मी पहिल्याच दिवशी आणि तेही एका गंभीर खटल्यात जामिनासाठी अर्ज कसा करणार? त्यावर छटवाल मला म्हणाले की, ‘‘याकूबने सीबीआयला पाकिस्तानसंबंधात माहिती दिली असून, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळवायला अनेक वर्षे लागली असती.’’केसवानी यांच्या माहितीनुसार, त्यांनी त्यानंतर जामिनासाठी अर्ज सादर केला. तेव्हा सीबीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मद्रासच्या वरिष्ठ वकिलाने या अर्जाला अतिशय निकराने विरोध केला व शेवटी जामिनाचा अर्ज फेटाळला गेला. मग मी परत छटवाल यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो की, काल तुम्ही माझी थट्टा करीत होते की आता न्यायालयात? त्यावर छटवाल यांनी सांगितले की, ‘‘जामीन अर्जाला विरोध करण्याचा दिल्लीहून रात्री आदेश आला होता.’’ छटवाल हे काही अत्यंत कनिष्ठ असे अधिकारी नाहीत की त्यांची आश्वासने गांभीर्याने घेऊ नयेत. शिवाय ते मुख्य तपास अधिकारीही होते. हे तर खात्रीने सांगता येते की, याकूबला याआधी काही आश्वासने दिली गेली होती; परंतु नंतर ती पाळली गेली नाहीत. छटवाल यांनी गीतेवर हात ठेवून सांगावे की, त्यांनी मला जामिनासाठी अर्ज करायला सांगितला नव्हता, असेही केसवानी म्हणाले.छटवाल यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते रागावून म्हणाले की, हा सगळा मूर्खपणा असून, तो (केसवानी) खोटे बोलत आहे.