"वक्त है बदल जाएगा...आज तुम्हारा है कल हमारा आयेगा", भुजबळांचा भाजपावर शायरीतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:40 PM2022-04-08T15:40:57+5:302022-04-08T15:41:53+5:30

सोलापूर- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला ...

Chhagan bhujbal taunt bjp through sher shero shayari | "वक्त है बदल जाएगा...आज तुम्हारा है कल हमारा आयेगा", भुजबळांचा भाजपावर शायरीतून निशाणा

"वक्त है बदल जाएगा...आज तुम्हारा है कल हमारा आयेगा", भुजबळांचा भाजपावर शायरीतून निशाणा

googlenewsNext

सोलापूर-

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोलापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. भुजबळ यांनी यावेळी शायरीतून भाजपाचं नाव न घेता टीका केली. "वक्त है बदल जाएगा...आज तुम्हाला है कल हमारा आयेगा", असं छगन भुजबळ म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुजबळ यांनी सर्वांना एकत्र राहण्याचं आणि पक्ष अडचणीत येईल असं कोणतंही काम न करण्याचं आवाहन केलं. 

"एक लक्षात ठेवा ही जी दादागिरी सध्या चालली आहे ना...वक्त है बदल जाएगा, आज तुम्हाला है, कल मेरा आयगा. शरीफ है हम लढते नहीं, लेकीन जमाना जानता है किसी के बाप को डरतें नहीं", अशा शायरीतून छगन भुजबळ यांनी भाजपावर टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहवं, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावं आणि नेहमी पवार साहेबांच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

आपले कोण अन् परके कोण ओळखा
छगन भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखा असा मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,"वक्त जो है वो दिखाई नहीं देता. मगर बहुत कुछ दिखा देता है. अपनापन तो हरकोई दिखाई दिखाता है लेकीन अपना कौन है ये वक्त आने पे पता चलता है. एकमेकांच्या दु:खामध्ये सहभागी व्हा. एकमेकांना प्रेमाने जवळ घ्या", असं छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: Chhagan bhujbal taunt bjp through sher shero shayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.