Chance of rain on Friday in Vidarbha, Central Maharashtra, Marathwada; Transformation of Niwar into a severe cyclone | विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

ठळक मुद्देसांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबांद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला पावसाची शक्यता राज्यात मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळाचे बुधवारी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते मध्यरात्री अथवा पहाटे तामिळनाडुच्या किनारपट्टीवर धडकणार आहे़ त्यामुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पाँडेचरीमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या हे चक्रीवादळ पाँडेचरीपासून १९० किमी अंतरावर आहे. ते मध्यरात्री अथवा पहाटे कराईकल आणि ममल्ललापूरम दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़ यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर त्याचा जोर कमी होण्याची शक्यता असून २६ नोव्हेंबरला त्याची तीव्रता कमी होऊन काही तासांनंतर ते शांत होण्याची शक्यता आहे. 

राज्यात मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ त्याचवेळी विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे १२़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते २७ नोव्हेंबर तसेच वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात २६ व २७ नोव्हेंबर रोजी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबांद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chance of rain on Friday in Vidarbha, Central Maharashtra, Marathwada; Transformation of Niwar into a severe cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.