शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 7:29 PM

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १० व ११ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ठळक मुद्देबारामतीसह पर्जन्यछायेच्या प्रदेशात मुसळधार पाऊस

पुणे : पर्जन्यछायेच्या प्रदेशात रविवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात आटपाडी, बारामती, माळशिरस १००, इंदापूर ९०, कडेगाव, पंढरपूर, पन्हाळा, वाई ७०, दहीवडी, माण, कराड, विटा ६०, खटाव, वडुज, नांदगाव, फलटण, सुरगाणा, तासगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यातील लोहारा ९०, तुळजापूर ८०, अंबेजोगाई, औरंगाबाद, कंधार, उस्मानाबाद, वैजापूर ५० मिमी पाऊस पडला. कोकणात मालवण, लांजा, राजापूर, सावंतवाडी येथे मुसळधार पाऊस पडला.विदर्भातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कोकणातील सर्व जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून ९, १० व ११ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ८ सप्टेंबर रोजी, पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १० व ११ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान