श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:22 PM2019-07-25T18:22:28+5:302019-07-25T18:31:14+5:30

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत.

challenge of Vikhe Patil The shrigonda constituency Win | श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

googlenewsNext

मुंबई – राज्यात आणि देशात भाजपची सरकार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. त्यात महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा भाजपने आता गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने आपली ताकद वाढवली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आज पर्यंत भाजपला एकदाही आमदार निवडणून आणता आले नाही. त्यामुळे आता विखे पाटील हे तरी आघडीच्या गडाला पाडणार का अशी चर्चा आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत. युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपला एकदाही इथे उमदेवार निवडणून आणता आले नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नाही. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नगर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे नगरमध्ये  गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपला अपयश आले होते. अशा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचे आव्हान विखेंना असणार आहे. त्यातच गेल्यावेळी पाचपुते सारखे मातब्बर नेत्याला श्रीगोंदामधून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा मतदारसंघात भाजपचा उमदेवार यावेळी तरी विखे निवडणून आणतील का ? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Title: challenge of Vikhe Patil The shrigonda constituency Win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.