शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांच्या निवडणुकीला आव्हान

By admin | Updated: June 17, 2015 03:38 IST

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार

राकेश घानोडे, नागपूरविधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. मिलिंद माने, डॉ. देवराव होळी, कीर्तीकुमार भांगडिया, राजू तोडसाम, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेश काशीवार व रामचंद्र अवसरे या विदर्भातील नऊ आमदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी सुनील केदार हे काँग्रेसचे तर, उर्वरित सर्व भाजपाचे आमदार आहेत.मतदार अ‍ॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किशोर गजभिये यांनी डॉ. मिलिंद माने, आॅल इंडिया फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी डॉ. देवराव होळी, शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी कीर्तीकुमार भांगडिया, शरीफ खा वझीर खा यांच्यासह सात मतदारांनी राजू तोडसाम, भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी सुनील केदार, शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी मल्लिकार्जुन रेड्डी, काँग्रेसचे उमेदवार सेवकभाऊ वाघाये यांनी राजेश काशीवार तर, रणजित चव्हाण यांनी रामचंद्र अवसरे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. या आमदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांची निवडणूक रद्द करून संबंधित मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. न्यायालयाने संबंधित आमदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निवडणूक याचिकेवर सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, डॉ. मिलिंद माने व मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती सुनील शुक्रे, डॉ. देवराव होळी व राजू तोडसाम यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती झेड.ए. हक, कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर तर, रामचंद्र अवसरे व राजेश काशीवार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले आहे.केदार यांच्यासाठी नवे न्यायपीठसुनील केदार यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्यात आले होते. परंतु, न्यायमूर्ती देशपांडे यांनी काही कारणास्तव ही याचिका ‘नॉट बिफोर मी’ केली. यामुळे याचिकेसाठी नवीन न्यायपीठ स्थापन होणार आहे.