शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांच्या नियुक्तीला आव्हान

By admin | Updated: August 3, 2016 05:34 IST

विश्वस्त मंडळावर घाईघाईने राजकारण्यांची नियुक्ती करण्यात आल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करताच शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर घाईघाईने राजकारण्यांची नियुक्ती करण्यात आल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. २०१७-१८मध्ये साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण होणार असल्याने याचा भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३,१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. हा पैसा लाटण्यासाठी घाईघाईने राज्य सरकारने शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली, असा आरोप जनहित याचिकेद्वारे केला आहे.याचिकेनुसार, सरकारने २८ जुलै रोजी अधिसूचना काढून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली. यामध्ये सर्व सदस्य राजकारणी असून, ते कोणत्या ना कोणत्या केसमध्ये अडकलेले आहेत. यापैकी बऱ्याच जणांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. या सर्व सदस्यांची नियुक्ती शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान नियम २०१३च्या विरुद्ध आहे. तसेच विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यापूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता होती. मात्र न्यायालयाची परवानगी न घेताच राज्य सरकारने घाईघाईने विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली. राज्य सरकारने विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यापूर्वी उच्च न्यायालयाने नेमलेले हंगामी तत्त्वावरील विश्वस्त मंडळ कार्यरत होते. उच्च न्यायालयाने संबंधित कायद्यानुसारच नवे विश्वस्त मंडळ स्थापण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. मात्र विश्वस्त मंडळ नेमण्यासंदर्भात नियम तयार न करताच राज्य सरकारने २८ जुलै रोजी घाईघाईने विश्वस्त मंडळ नेमले. ‘२०१७-१८मध्ये साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण होतील. हा सोहळा साजरा करण्यासाठी ३,१०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरकारकडून परवानगी मागितली आहे. हा पैसा लाटण्यासाठी सरकारने त्वरित विश्वस्त मंडळ नेमले,’ असा आरोप याचिकेद्वारे केला आहे. (प्रतिनिधी) >नेहमीच वादातश्री शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात आले आहे. 2004च्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा वाद उच्च न्यायालच्याच्या औरंगाबाद खंडपीठापुढे प्रलंबित असताना आता २८ जुलै रोजी नव्या मंडळाच्या नियुक्तीबाबतच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. व्यावसायिक व महाराष्ट्र सहकारी बँकेचे सदस्य सुरिंदर अरोरा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.