भोंदू खरातला फोन करणाऱ्यांमध्ये चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर; दोघांमध्ये झाले ३३,७२७ सेकंद संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:15 IST2026-04-16T12:14:30+5:302026-04-16T12:15:23+5:30

Ashok Kharat Case: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली.

Chakankar is second among those who called Bhondu Kharat; the two had a conversation of 33,727 seconds | भोंदू खरातला फोन करणाऱ्यांमध्ये चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर; दोघांमध्ये झाले ३३,७२७ सेकंद संभाषण

भोंदू खरातला फोन करणाऱ्यांमध्ये चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर; दोघांमध्ये झाले ३३,७२७ सेकंद संभाषण

मुंबई - नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली. यामध्ये पहिल्या क्रमाकांवर खरातची मुलगी असून दुसऱ्या क्रमाकांवर रूपाली चाकणकर यांचा क्रमांक असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. खरात आणि चाकणकर यांच्यात तब्बल ३३ हजार ७२७ सेकंद संभाषण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. चाकणकर आणि खरातचे संबंध किती घनिष्ठ होते याची माहिती दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. खरातला कॉल केलेल्यांची यादीच त्यांनी जाहीर केली. यामध्ये पहिल्या १० जणांच्या यादीत रूपाली चाकणकर यांचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चाकणकर यांनी खरात याला एकूण १७७ फोन केले होते. यामध्ये इनकमिंग कॉल्स ११९ आणि आऊटगोईंग कॉल्स ५८ आहेत. एके दिवशी चाकणकर यांनी खरातसोबत २२ मिनिटे बोलत होत्या, असे सांगत दमानिया यांनी त्यांच्या कॉल्सचे  पुरावे दाखवले.

 

 

Web Title : रूपाली चाकणकर धोखेबाज खरात को कॉल करने वालों में दूसरे स्थान पर

Web Summary : अंजलि दमानिया ने खुलासा किया कि रूपाली चाकणकर अशोक खरात को कॉल करने वाली दूसरी सबसे बड़ी कॉलर थीं। चाकणकर ने कुल 33,727 सेकंड की 177 कॉलें कीं। इस खुलासे से उन्होंने अहम पदों से इस्तीफा दे दिया।

Web Title : Rupali Chakankar Second Most Frequent Caller to Fraudulent Kharat

Web Summary : Anjali Damania revealed Rupali Chakankar was the second most frequent caller to Ashok Kharat. Chakankar made 177 calls totaling 33,727 seconds. This revelation led to her resignation from key posts.