शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचे साहित्य केंद्रीय अभ्यासक्रमात

By admin | Updated: July 18, 2015 00:13 IST

सीबीएसई, आयसीएसई आदी केंद्रीय विद्यालयातील अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत आणि समाजसुधारकांच्या चरित्राचा समावेश करावा, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ

मुंबई : सीबीएसई, आयसीएसई आदी केंद्रीय विद्यालयातील अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत आणि समाजसुधारकांच्या चरित्राचा समावेश करावा, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील थोर संत व समाजसेवकांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला होता. या वेळी बोलताना तावडे म्हणाले की, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांचा अभ्यासक्रम केंद्राकडून ठरतो. यात राज्य सरकार कोणताच हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु या बोर्डात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आदी महापुरुषांचे विचार कळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय अभ्यासक्रमात राज्यातील थोर संत व समाजसुधारकांचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मंत्री तावडे यांनी दिले. सदर महापुरुषांचे चरित्र व साहित्याच्या प्रकाशनासाठी समित्या अस्तित्वात असून, सामाजिक न्याय व शिक्षण खात्याकडून हे साहित्य प्रकाशित केले जाते. आगामी काळात डिजिटल माध्यमात सदर साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय, शासकीय मुद्रणालयात छापले जाणारे साहित्य राज्यभर वितरित करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)