शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य सरकार असंवेदनशील

By admin | Updated: May 5, 2015 02:11 IST

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते.

औरंगाबाद : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते. सरकारने वास्तवतेचे भान ठेवून कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला़ पवार म्हणाले, की यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात जास्त होत होत्या. या वेळेला मराठवाड्यात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नैराश्य दिसत आहे. दुष्काळ किंवा गारपिटीमुळे नुकसान झाले, तर त्याला तत्परतेने मदत करण्याची खबरदारी घ्यायला पाहिजे; पण सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार त्यात कमी पडत असल्याचे पवार म्हणाले़ राज्यातील मागास भागांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. विशेषत: पाण्याचा असमतोल कमी करण्यासाठी ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत; पण आतापर्यंत जनतेकडून तसे दिसत नाही. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तेथील जनतेने तसा कौल दिलेला नाही. त्यामुळे मला वेगळ्या विदर्भाचे मत हे तेथील जनतेचे असेल असे वाटत नाही. ते चार नेत्यांचे असेल. एमआयएमचे यश तात्पुरतेऔरंगाबाद महापालिकेत एमआयएमने मिळविलेल्या यशाविषयी पवार म्हणाले, एमआयएमकडे काही लोक खेचले गेले हे खरे आहे; पण ही कायमची फेज नाही. केवळ अशा गोष्टी वर्ष दोन वर्षे होतात. उसाला तीन हजार भाव हवासरकार बदलल्यानंतर वर्षभरात शेतकऱ्यांची काय दैना केली हे सर्व जण बघतायत. म्हणून वेडीवाकडी भाषणे करायची आणि स्वत:वर जबाबदारी आली तेव्हा ती दुसऱ्यावर ढकलायची हे बरोबर नाही, असा टोला पवार यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला. उसाला २७०० ते ३००० रुपये भाव मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)