सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर

By Admin | Updated: May 27, 2014 05:43 IST2014-05-27T05:43:56+5:302014-05-27T05:43:56+5:30

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई)च्या बारावी विद्यार्थ्यांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

CBSE's HSC result | सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर

पुणे : ‘सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई)च्या बारावी विद्यार्थ्यांचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांची सोमवारी दुपारी १२ वाजेपासूनच निकाल पाहण्यासाठी इंटरनेटपुढे गर्दी झाली होती. दरम्यान, सोमवारी फक्त चेन्नई विभागातील निकाल जाहीर झाला असून, उत्तरेकडील राज्यातील निकाल उद्या (दि. २७) जाहीर करण्यात येणार आहे. यंदा देशभरातील विविध शाळांमधील सुमारे १० लाख २९ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ६ लाख ३ हजार ६४ विद्यार्थी आणि ४ लाख २६ हजार ८१० विद्यार्थिनींचा समावेश होता. सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या वानवडी येथील शाळेचा निकाल ९९ टक्के लागला. कपिल आहुजा याने ९९ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला. शाळेतील ३६ मुलांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. कपिलने गणित विषयात १००पैकी १००, भौतिकशास्त्र विषयात १००पैकी ९५ गुण मिळविले. ईशा आगरवाल हिने रसायनशास्त्र विषयात १००पैकी १०० गुण तर, शगुफ्ता खान हिने जीवशास्त्र विषयात १००पैकी ९८ गुण मिळविले. प्रभात चलमेट्टी याने संगणकशास्त्र विषयात १००पैकी ९९ गुण मिळवून चमक दाखविली. (प्रतिनिधी)

Web Title: CBSE's HSC result