शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: June 5, 2014 02:45 IST

लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लाखो कार्यकत्र्यानी प्रचंड घोषणाबाजी केली़ त्यामुळे वातावरण अतिशय भावुक झाले होत़े

उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर संतप्त कार्यकर्ते झाले शांत
संजय तिपाले - बीड
लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लाखो कार्यकत्र्यानी प्रचंड घोषणाबाजी केली़ त्यामुळे वातावरण अतिशय भावुक झाले होत़े मात्र, आ़ पंकजा पालवे यांची भावनिक साद व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतरच कार्यकर्ते शांत झाले. 
गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव वैद्यनाथ कारखाना परिसरात आणण्यापूर्वीपासूनच कार्यकत्र्यातून घोषणांचा पाऊस सुरु होता़ परत या़़ परत या़़ मुंडे साहेब परत या़़़, गोपीनाथ मुंडे अमर रह़े़़ या घोषणांबरोबरच ‘सीबीआय चौकशी झालीच पाहिज़े़’ अशा घोषणाही देण्यात आल्या़ याशिवाय नितीन गडकरी यांच्या विरोधातही कार्यकत्र्यानी घोषणा सुरु केल्या़ मुंडेंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल़े यावेळी तासभर कार्यकत्र्यानी प्रचंड गर्दीत अंत्यदर्शन घेतल़े त्यानंतर घोषणा देणारे  कार्यकर्ते बॅरिकेटस्ला चिकटून उभे होत़े त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अधिकच संतप्त झाल़े  आ़ पंकजा पालवे यांनी कार्यकत्र्याना संयम राखण्यास सांगितल़े
‘तुम्हाला बाबांची शपथ आहे, तुम्ही शांत राहा़़ अंत्यदर्शनाला गालबोट लागेल असे कृत्य करु नका असे त्या अश्रू ढाळत म्हणाल्या़ त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातात माईक घेऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितल़े त्यानंतर कार्यकत्र्यानी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला़ पंकजा, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर कार्यकत्र्याना दिलासा मिळाला त्यानंतर घोषणाही कमी झाल्या़ त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली़