शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचे आकस्मिक निधन

By admin | Updated: December 2, 2014 04:23 IST

सोहराबुद्दीन खोटी चकमक खटल्याचे व मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लोया यांचे रविवारी रात्री रविभवन येथे हृदयविकाराने निधन झाले.

नागपूर : सोहराबुद्दीन खोटी चकमक खटल्याचे व मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लोया यांचे रविवारी रात्री रविभवन येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आसिफ कुरेशी यांनी शोक व्यक्त केला. लोया यांचे मूळ गाव लातूर हे आहे.लोया हे मुंबई येथील लिगल एड सर्व्हिसेसच्या अध्यक्षा व चंद्रपूर येथील तत्कालीन प्रधान जिल्हा न्यायाधीश स्वप्ना जोशी यांच्या मुलाच्या विवाह समारंभाानिमित्त नागपुरात आले होते. त्यांचा रविभवन येथे मुक्काम होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून खोट्या चकमकीचे हे प्रकरण अहमदाबाद येथून मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाकडे स्थानांतरित करण्यात आलेले आहे. या प्रकरणी सीबीआयने या न्यायालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३७ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार ही खोटी चकमक नोव्हेंबर २००५ मध्ये घडली होती. मध्य प्रदेशच्या उज्जैन भागातील सोहराबुद्दीन अन्वर हुसेन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे हैदराबाद-सांगली या बसमधून अपहरण करून खोट्या चकमकीत त्यांना ठार केले होते. त्यानंतर डिसेंबर २००६ मध्ये या खोट्या चकमकीचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती यालाही अशाच पद्धतीने ठार केले होते. ही दोन्ही प्रकरणे लोया यांच्या न्यायालयात होती. (प्रतिनिधी)