शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: May 3, 2015 02:12 IST

आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी, अकोला कार्यालयासोबत जमीनही जप्त.

अकोला : 'बीएचआर' बँकेत ठेवीवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांना लाखो रुपयांनी गंडविल्या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी बीएचआर बँकेच्या अकोला कार्यालयासोबतच मोहता मिल परिसरातील बँकेची जमीन व एक कार जप्त केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्व अटक आरोपींना जळगाव कारागृहात पाठविण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, जुने शहरातील डाबकी रोडस्थित आश्रयनगर रहिवासी सेवानवृत्त सैनिक गजानन रामसा धामंदे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी जळगाव येथील प्रमोद भाईचंद रायसोनी सोबतच दिलीप क्रांतीलाल चोरडिया, मोतीलाल ओंकार जिरी, सुरजमल बभुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भगवान संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भगवान हीरामण वाघ, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम लालवानी, शेख रहजान शेख अब्दुल नबी मन्यार, ललि ताबाई राजू सोनवणे, प्रतिभाबाई मोतीलाल जिरी, सुकलाल शहादूर माळी, यशवंत ओंकार जिरी यांच्याविरुद्ध कलम ४0६, ४२0, १२0 (ब) तसेच महाराष्ट्र निवेशक हितसंबंध सुरक्षा अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी जळगाव कारागृहात असल्याने शहर कोतवाली पोलिसांनी अकोला व जळगाव येथील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी दोन महिला आरोपींना सोडून इतर १३ आरोपींना जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले होते.न्यायालयाने सर्व आरोपींना २ मे पर्यंंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपास पथकाने जळगाव येथे जाऊन बीएचआर संस्थेच्या जळगाव कार्यालयाला सील करून ८५ लाख रुपयांचे २२ धनादेश जप्त केले होते. शनिवार, २ मे रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, आरोपींना जळगाव येथील कारागृहात पाठविण्यात येणार आहे.