मालवाहतूकदारांचे चक्काजाम सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:29 AM2018-07-24T00:29:13+5:302018-07-24T00:30:20+5:30

आंदोलन मागे घेतल्याची अफवा; शिखर संघटना मागण्यांवर ठाम

Cargo handling continues! | मालवाहतूकदारांचे चक्काजाम सुरूच!

मालवाहतूकदारांचे चक्काजाम सुरूच!

Next

मुंबई : मालवाहतूकदारांच्या सर्व मागण्य मान्य झाल्यानंतरच शिखर संघटनेच्या कोअर कमिटीतील पाच सदस्य एकत्रित पत्रकार परिषद घेऊन चक्काजाम आंदोलन मागे घेण्याची घोषणा करतील. तोपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केले आहे. चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची अफवा पसरल्यानंतर शिखर संघटनेने सोमवारी ही भूमिका स्पष्ट केली.
संघटनेचे चेअरमन कुलतारण सिंह अटवाल म्हणाले की, मालवाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनात फूट पडावी म्हणून, आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र तसे काहीही नसून अद्याप सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात रविवारी सुट्टीच्या दिवशीही बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले. संघटनेचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी सांगितले की,
बेमुदत चक्काजामच्या समर्थनार्थ मुंबईतील वाहतूकदारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोबतच मुंबईतील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सर्व बाजारपेठा पालथ्या घालत आहेत.

Web Title: Cargo handling continues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.