car accident near the Aundh Bridge on a speeding road; 1 women dies and 1 injured | द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, एकजण जखमी
द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, एकजण जखमी

लोणावळा: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते मळवली दरम्यान असलेल्या औंढे पुलाजवळ भरधाव कार रस्त्यांच्याकडेला लावलेल्या लोखंडी पत्र्याला धडकून रस्त्यावर उलटल्याने कारचाअपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यु झाला तर एक जण जखमी झाले आहेत. आज (बुधवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाचे सुरक्षा पथक तसेच प्रवासी यांनी सदर गाडीत आडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढत रुग्णालयात रवाना केले. मयत व जखमी हे मुंबई भागातील असून त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची खबर दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिली.

Web Title: car accident near the Aundh Bridge on a speeding road; 1 women dies and 1 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.