शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर जाळला जातोय कचरा

By admin | Updated: June 8, 2017 01:03 IST

कोंढवा बुद्रुक येथील शांतीवन सोसायटीसमोर टाकलेला कचरा सर्रास जाळला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कउंड्री : कोंढवा बुद्रुक येथील शांतीवन सोसायटीसमोर टाकलेला कचरा सर्रास जाळला जात आहे. कचरा जाळल्याने होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुरामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, श्वास घेण्यास त्रास होणे व इतर श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. ज्या ठिकाणी कचरा पेटविला जात आहे, त्या ठिकाणी असलेली दोन मोठमोठी झाडेही कचऱ्यामुळे जाळली जात आहेत. ही झाडे या ठिकाणी अनेक वर्षांपासून आहेत. तसेच, या झाडांची घनदाट सावली बाजूच्या रस्त्यावर पडत असल्याने उन्हाळ्यात वाहनचालक या भागातून जाताना सुखावतात. या दोन्ही झाडांचे बुंधे जमिनीपासून साधारणत: ४ ते ६ फूट इतके जळाळले आहेत. झाडाच्या बुंध्याचा कोळसा होत आहे. कचरा असाच जाळला गेला तर ही झाडे कोसळून पडतील.या ठिकाणी महानगरपालिकेने उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा व कायमस्वरूपी कचरापेटी ठेवून नियमित कचरा उचलून न्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शांतीवन सोसायटीतील रहिवासी करीत आहेत.दुर्गंधीचा त्रासकोंढवा बुद्रुक गावातून व्हीआयटी शिक्षण संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शांतीवन सोसायटी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत कायमच कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सोसायटीतील सदस्य, आजूबाजूचे रहिवासी व कोंढवा बुद्रुकमधून मार्केट यार्ड, बिबवेवाडी या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागतोच, पण कचरा जाळल्याने त्याच्या दुष्परिणामास तोंड द्यावे लागत आहे. साचलेल्या कचऱ्यात असलेल्या ओल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे.