शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांत अनावश्यक प्रकरणे दाखल करण्यावर लागणार ‘ब्रेक’

By admin | Updated: September 18, 2014 00:43 IST

राज्य शासनाकडून त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : राज्यात विवाद धोरण लागूनागपूर : राज्य शासनाकडून त्यांच्या विरोधात गेलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांत दाखल करण्यात येणाऱ्या अनावश्यक प्रकरणांना आता ‘ब्रेक’ लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत फटकारल्यामुळे शासनाने राज्यात विवाद धोरण (लिटिगेशन पॉलिसी) लागू केले आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात गेल्या २७ आॅगस्ट रोजी निर्णय जारी केला आहे.कनिष्ठ न्यायालये किंवा लवादांनी विरोधात निर्णय दिल्यास राज्य शासन बाजू बळकट नसतानाही वरिष्ठ न्यायालयात अपील करत होते. शासन गरज नसताना न्यायालयांवरील कामाचे ओझे वाढवित असल्याची व सार्वजनिक निधीचा अपव्यय करीत असल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ‘राज्य शासन वि. राजेंद्र टापर’ याप्रकरणात न्यायालयाने ४ आॅगस्ट रोजी राज्यात विवाद धोरण लागू करण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्य सचिवांना समन्स बजावण्यात आला होता. तसेच, हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारण्याचे निर्देश प्रबंधन कार्यालयाला दिले होते. शासनाने आज, बुधवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यात २७ आॅगस्टपासून विवाद धोरण लागू करण्यात आल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)धोरणातील तरतुदी१) धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यतंत्रविषयक योजना तयार करण्यात येईल. त्यानुसार राज्य, विभाग व जिल्हास्तरीय अधिकार प्रदत्त समित्यांची स्थापना करण्यात येईल.२) सरकारी वकिलांसोबत योग्य समन्वय ठेवण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात अवर सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या किमान एका मध्यस्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मध्यस्त अधिकारी प्रकरणांच्या क्रियाशील व्यवस्थापनासाठी जबाबदार राहील.३) अनावश्यक तहकुबी टाळण्यासाठी सरकारी वकील व प्रशासकीय विभाग यांच्यामध्ये आंतरसंवादाची प्रभावी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांची दैनंदिन कार्यवाही व घडामोडीची माहिती संबंधितांना करून देण्यात येईल.४) एकतर्फी आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यापूर्वी संबंधित आदेश रद्द करण्याकरिता एखादा अर्ज करणे योग्य ठरेल काय यावर विचार करावा. ५) सत्र न्यायालयातील फौजदारी प्रकरणांसाठी अतिरिक्त जलदगती न्यायालये स्थापन करता यावी याकरिता शासन योजना तयार करेल. तसेच संवेदनशील प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल.धोरणाची वैशिष्ट्ये१) विवादातील मध्यवर्ती मुद्यांचे कालमर्यादित पद्धतीने व्यवस्थापन करणे.२) उच्चस्तरीय समितीमार्फत सर्व प्रलंबित प्रकरणांचे पुनर्विलोकन करणे.३) मुदतबाह्य, निरुपयोगी व परिणामशून्य प्रकरणे निकाली काढणे.४) कोणतेही अपील, रिट याचिका, विशेष अनुमती याचिका दाखल करण्यापूर्वी प्रकरणांची काटेकोरपणे छाननी करण्याकरिता सक्षम यंत्रणा व मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे.५) शासकीय विधी अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करून जबाबदारीची संकल्पना मांडणे.६) दुय्यम न्यायालयांतील सुविधांमध्ये सुधारणा करून अतिरिक्त विशेष न्यायालये, जलदगती न्यायालये स्थापन करणे.