ब्रेन पेसमेकरच्या शस्त्रक्रिया यशस्वी

By Admin | Updated: March 31, 2015 04:32 IST2015-03-31T03:52:38+5:302015-03-31T04:32:32+5:30

डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ (डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया मुंबईतील जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली.

Brain pacemaker surgery successful | ब्रेन पेसमेकरच्या शस्त्रक्रिया यशस्वी

ब्रेन पेसमेकरच्या शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ (डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया मुंबईतील जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली.
आशियात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा जसलोक रुग्णालयाने केला आहे. पार्किन्सन्स डीसीज
आणि डिस्टोनियाने पीडित दोन रुग्णांमध्ये डीबीएस सिस्टिमचे रोपण करण्यात जसलोकच्या डॉक्टरांना
यश आले.
हे तंत्रज्ञान आधीच्या डीबीएस साधनांपेक्षा अधिक प्रभावी आहे. याआधीच्या साधनांच्या बॅटरीचे आयुष्य अत्यल्प होते. ही बॅटरी बदलून घेण्याकरिता रुग्णांना दर ३-४ वर्षांनी वेदनादायक शस्त्रक्रिया करून घ्यावा लागत असत. बोस्टन सायन्टिफिकच्या नव्या व्हेरसाईस सिस्टिममुळे बॅटरीचे आयुर्मान तब्बल २५ वर्षांनी वाढले आहे.
हा पेसमेकर ट्रेमरवरील उपचारांकरिता मेंदूतील विशिष्ट भागांना इलेक्ट्रिकल इंपल्स पाठवतो. या ट्रेमर्समुळे रुग्णांना लिहिणे, खाणे किंवा वस्तू हातात धरणे अशी दैनंदिन कामे करणे अवघड होते. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया केल्यानंतर पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. या खास तंत्रज्ञानामुळे स्टिम्युलेशनचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
या नव्या डीबीएस सिस्टमच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे
अनेक रुग्णांना अनेकवेळा शस्त्रक्रिया करुन घेण्याची निकड दूर होऊन पूर्णपणे नवे आयुष्य सुरु करता
येणे शक्य होईल. पूर्वी डीबीएस
थेरपी लहान मुलांवर वापरता येत
नसे, पण आता ते देखील शक्य
होईल, असे न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Brain pacemaker surgery successful